Thursday, April 25, 2024
HomeMarathiमाझ्या देशाची 'महासत्ताक' देशा कडे वाटचाल

माझ्या देशाची ‘महासत्ताक’ देशा कडे वाटचाल

माझ्या देशाची ‘महासत्ताक’ देशा कडे वाटचाल
“आजचा तरुण तु हो
हो मावळा तरुण
हो सत्यशोधक तरुण
हो आधुनिक तरुण”
स्वराज्यर्निमाते छत्रपती शिवाजी महाराज
संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर
आद्यक्रांतीवीर लहुजी राघोजी साळवे
सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सारख्या अनेक क्रांतीकारी महापुरुषांनी हा आपला महाराष्ट्र राज्य घडवला, र्निमाण केला आहे.
” जागा झाला तरुण अन्याय विरुद्ध लढायला
कुणी घेतली तलवार हाती कुणी लेखणी
दोन्ही मशाली नव चैतन्य निर्माण करती”
शिवाजी महाराजांनी स्वराज्य,डॉ.आंबेडकरानी संविधान, लहुजी साळवेंनी इंग्रजा विरुद्ध लढा, महात्मा जोतिबा फुलेंनी सत्यशोधक समाज, अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ,जातीभेद, धर्मभेद,अस्पर्श, शिक्षण,स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, क्षींमत,गरीब आशा अनेक सामाजिकदृष्ट्या घातक समस्या महापुरुषांनी आपला हक्क आणि न्यायकारि विचारधारा अवलंबून अनेक लढे देऊन या समस्या सोडवल्या.
पण सध्याची परिस्थिती पाहता या महाराष्ट्राला पुन्हा एकदा क्रांतीकारी लढ्याची गरज र्निमाण झालीच आहे.
कारण, या महाराष्ट्राराचा आजचा तरुण फक्त स्व:यांच्या जातीच्या,धर्माच्या, वंशाच्या नावाने जे जे कार करताणा सध्या जास्त प्रमाणात ठळक दिसुन येत आहे.प्रत्येकाला आपल्या जाती,धर्म, वंशाचा स्वभिमान असायलाच हवा,पण गर्व मुळीच नको.
आजचा तरुण जाती, धर्माच्या नावावर रंग वाटुन घेतले ,चौक वाटुन घेतले, येवडेच नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या महापुरुषांनाहि जाती, धर्मच्या नावाने वाटुन घेतले आहे.
तत्कालीन क्रांतीकारी परिस्थितीमध्ये त्या काळातील तरुण स्वातंत्र्य,अन्याय विरुद्ध लढण्यासाठी जात,धर्म हे विसरुन एकत्र आले होते.तेव्हा फक्त अन्याय विरुद्ध लढणारा सळसळता लाल रक्ताचा रंग होता. युद्ध कलेच शिक्षण, हक्क न्यायकारि विचारधारा जोपासण्यासाठी कुठे हि एकत्र येत.स्वातंत्र्य, हक्क,न्याय मिळाला पाहिजे हि एकच भुमिका होती.
पण आजचा तरुण हा इतिहासाला विसरलाआहे.
कारण, जाती, धर्माच्या नावाखाली दंगली घडवल्या जातात,कुणावर अन्याय केला जातो, भेदभाव केला जातो.
क्रांतिकारी काळातील तरुण महापुरूषांची विचारधारा, प्रबोधनपर कार्यक्रम समजुन घेण्यासाठी आणि युद्ध कलेच प्रशिक्षिण शिकण्यासाठी त्या काळातील तरुण धडपडत होते .सर्वच लढ्यात तरुण वर्ग आग्रह असत.
पण आजचा तरुण इतिहास विचारला आहे. दारूपाई व्यसणाधीण झाला आहे. दारू हि शरीरसाठी चांगली आहे हे विज्ञान हि मान्य करत पण खूप जास्त प्रमाणात दारू पिणे,ध्रुरपाण करणे, वडिलधारांचा आधार नकरणे,चुकिची विचारधारा, गंडगिरी,नेतेगिरी, काही अपवाद वगळता या गोष्टींना विरुद्ध नाही पण काही मर्यादा असायला पाहीजे. त्या काळात
“तुम मुझे खुण दो
मे तुमे आजादि दुगा”
ह्या क्रांतीकारि वाक्प्रचार जनु बदलाच आहे.
“तुम मुझे तंबाखू दो
मे तुमे चुना दुगा”
अस लिजासपद वाक्य तयार केले आहे.नोकरी करत नाहीत. सार्वजनीक उत्सवा च्या नावाखाली जबरदस्तीनी जास्त वर्गणी मागतात,डि.जे चा आवाज जास्त वाढवतात,गणपतीच्या माडवामध्ये पत्ताचे डाव खेळतात.मोबाइलचा आती वापर करतात.आणि या तरूणाच राष्ट्र प्रेम 15 आँगस्ट,26 जानेवारी फक्त अशाच दिवशी जागी होत.हे सर्व पाहून मला वाटत कि तरुण स्वा:वर अन्यायच करत आहे.
या सर्व गोष्टीचा चुकिचा परिणाम स्वा:ताच्या परिवारावर, आपल्या देशावर,राष्ट्रवर होऊ शकतो किंबहुना होत आहे.
डॉ. अब्दुल कलाम म्हणाले आहेत.आपल्या देश जगा मध्ये महासत्ताक देश होणार आहे या तरुणाच्या बळावर .हो ज्या प्रमाणे चुकीची विचारधारा जोपासणारे तरुण आपल्या देशात,राष्ट्रात आहेत त्याच्या खुप जास्त प्रमाणात शिवाजी महाराजां पासून डॉ. अब्दुल कलाम यांच्या विचारधारा जोपासलेले तरुण सुध्दा आहेत.
विज्ञान,संस्कृती,कला क्षेत्रात चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत.
पण जर शिवाजी महाराजां पासून ते डॉ.अब्दुल कलाम यांच्या विचारधारा या महाराष्ट्राच्या, देशाच्या प्रत्येक तरूणीने जोपासली पाहीजेच.
तेव्हाच आपला देश जगात ‘महासत्ताक’देश होईल, गुणेगारी कमी होईल,शिक्षण प्रणाली सुधारेल,प्रगतीशील मार्ग चालेल, विकसनशील होईल.
पहिल्या सारख सोनाचा धुर तर नाही निघणार पण जगात एक आदर्श देश, नक्कीच होईल.
या गोष्टींचा विचार नक्कीच आजच्या तरुणांनी करायला पाहीजे .तेव्हाच चांगला बदल घडु शकतो.
“बदल घडऊ आपण चांगला
जोपासु विचारधारा क्रांतीकारी”
-सुंदर कांबळे, बीड

मराठी लेख

RELATED ARTICLES

Most Popular