वस्ताद लहुजी साळवे
“जगेल तर देशासाठी
मरेल तर देशासाठी”
“अन्याय विरुद्ध लढणारा
क्रांतीकारक लहुजी साळवे ”
लहु राघोजी साळवे हे त्यांच पुर्ण नाव पण वस्ताद लहुजी साळवे या नावाने ते महाराष्ट्राला परिचित आहेत.
लहुजींचा जन्म 14नोव्हेंबर 1794 रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावातील राघोजी व विठाबाई या मातंग समाजातील कुंटुबात झाला.
साळवे हे पराक्रमी घराणे असुण छत्रपती शिवाजी महाराजांनी लहुमांग साळवे यांना(लहुजींचे आजोबा) ‘राऊत ‘ हि पदवी देऊन पुरंदर किल्ल्याची संरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
लहुजींचे वडील राघोजी साळवे यांनी वाघा सोबत युद्ध करुन जिवंत वाघाला खांद्यावर पेशव्यांच्या दरबारात सादर केले होते.
5-17 नोव्हेंबर 1817 रोजी झालेल्या लढाईत मौंट स्ट्युअर्ट एल्फिन्स्टनच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याविरुध्द तबल 12 दिवस राघोजी व 23 वर्षि लहुजी आणि मावळे लढा देत असताना राघोजी साळवे हे शहीद झाले
वडिलांना मरेपर्यंत झुंज देताना पाहुन लहुजींनी आजन्म ब्रह्मचारी राहुण
“जगेन तर देशासाठी
मरेन तर देशासाठी ”
मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निराधार केला.
1823 मध्ये लहुजींना अवगत आसलेल युद्ध कौशल्य दांड पट्टा,छडि पट्टा,घोडेस्वारी,बंदुक चालवने,निशाणेबाजी आशा अनेक युद्ध कौशल्य आपण इतरांनाही शिकऊण आपल्या भारत देशाला जुलमी इग्रजान पासुन स्वातंत्र्य करु या विचारातु त्यांनी पुण्यातील गंजपेठ येथे महाराष्ट्रातील पहिली तालीम नाना रास्ते त्यांचा हस्ते सुरु केली.
या तालमीमध्ये सर्व जाती ,धर्मातील तरुणांना अन्याय विरुद्ध लढण्यासाठी आणि स्वातंत्र्य लढ्यासाठि एकत्रित केले.प्रमुख्याने वासुदेव बळवंत फडके,लोकमान्य टिळक,जोतिबा फुले,गणेश आगरकर,चाफेकर बंधु,उमाजी नाईक अशा अनेक स्वातंत्र्य व अन्याय विरुद्ध लढणाराना लहुजींनी युद्ध कलेचे प्रशिक्षिण दिले.
1848 मध्ये लहुजींच्या तालमीमध्ये महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले या दांपत्याणे अस्पृश समाजातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या मुलींच्या शाळेला तत्कालिन काळात काही लोंकाचा विरुद्ध होता. या लोकांना नघाबरता लहुजींनी आपल्या पुतणीस मुक्ता साळवेला शाळेत पाठवण्यास सुरुवात केली. व अनेक इतर मुलीं हि येऊ लागल्या.
पण या अस्पृश समाजातील मुलींच्या शाळेला काही लोकांचा विरोध होता. शिक्षकांनवर आणि फुले दांपत्यावर जीवघेणे हल्ले होत होते. म्हणुन लहुजींनी त्यांचा तालमीतील दोन शिक्षाना (पैलवान) फुले दांपत्याची व इतर शिक्षकांची संरक्षणाची जबाबदारी सोपवली होती.
1854 साली मुक्ता साळवे ह्यांनी लहुजी व फुले दांपत्याला अन्याय विरुद्ध लढताना पाहत तत्कालिन जातिभेद , धर्म, दलितांच्या परिस्थितीवर ‘ज्ञानोदय’हा निबंध व ‘आम्ही धर्म नसलेली मानस’हा ग्रंथ लिहिला.
1857च्या उठावात लहुजींच्या तालमीमध्ये तयार झालेला अनेक क्रांतीकार सामिल झाले होते. पण त्यांना फाशी व जन्मठेपेची शिक्षा ब्रिटिशांनी दिल्या.
लहुजी साळवे यांनी आपल्या
87 वर्ष जीवन इतिहासात अनेक युद्ध,उठाव, क्रांतीकारक तयार केले,जातिभेद व अन्याय विरुद्ध लढले. पण “उगवलेल्या सुर्याला हि मावळाव लागत”तसच
अद्याक्रांतिकार, वस्ताद, अद्यागुरु,वीरपुरूष,पैलवान, धर्मवीर,ह्या उपमा त्यांनी आपल्या संघर्षमय जीवनात मिळवल्या आहेत.
वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांचा मृत्यू 17 फेंब्रवारी 1881रोजी पुणे येथील संगमवाडि(संगमपुर)येथे शिक्षाना युद्ध कौशल्य शिकवत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला.
पण हा 87 वर्षाचा संघर्षमय इतिहास थोडा चुकीचा आहे. अस आपल्या महाराष्ट्र राज्य इयत्त 11वी इतिहास विषयाच्य् पुस्तका मध्ये वस्ताद लहुजी साळवे यांचा जन्म (इ.स1880) मध्ये झाला आहे. अस दर्शवले आहे.
पण एक मात्र नक्की खर आहे की, मातंग समाजातील अद्याक्रांतिकार लहुजी साळवे यांनी अनेक शिक्षाना युद्ध कलेच प्रशिक्षिण दिले वअन्याय विरुद्ध लढण्यासाठी तयार केले.
सुंदर कांबळे, बीड
– 8308721734