Blogsbro

आकाश आज खूपच अस्वस्थ होता. आज बरोबर एक महिना झाला होता , त्याला श्वेताला भेटून . तरीसुद्धा तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून दूर होत नव्हता. तो रात्रंदिवस फक्त तिचाच विचार करत असे.
आकाश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पत्रकारीतेचं शिक्षण घेतोय. त्याचा स्वभाव कमालीचा शांत आहे , याउलट श्वेता ही मनमिळावू आणि बोलघेवड्या स्वभावाची मुलगी आहे. श्वेता ची आठवण येताच त्याच्या चेहर्‍यावर हलकेच स्मित हास्य उमटले. तिच्या आठवणीने तो बेफाम झाला त्याचे भान हरपले. त्यांची पहिली भेट त्याला आठवली .
त्यादिवशी आकाश जरा लवकरच घरून निघाला होता. त्याला लवकरात लवकर विद्यापीठात पोहोचायचं होतं. विद्यापीठात पोहोचण्यासाठी त्याला दररोज ३५ किमी चा प्रवास करावा लागे. कधीकधी बसेस लवकर येत नाहीत व जायला उशीर होतो. याची जाणीव असल्याने तो आज जरा लवकरच घरून निघाला होता. त्यामुळेच विद्यापीठातही तो वेळेवर पोहोचला. विद्यापीठात पोहोचल्या बरोबर तो सरळ मराठी विभागाकडे गेला. मराठी विभागात आज वैचारिक लेखन कार्यशाळा होणार होती. या कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठीच तो घरून लवकर निघाला होता. मराठी विभागात जाताच तो तडक नोंदणी कार्यालयाकडे गेला व तेथे नोंदणीसाठी प्रतीक्षा करत असलेल्या रांगेमध्ये सहभागी झाला. थोडा वेळ प्रतीक्षा केल्यानंतर त्याची नोंदणी झाली.
नोंदणी झाल्यानंतर तडक सभागृहाकडे जावे असा त्याचा मानस होता. त्याप्रमाणे तो सभागृहाकडे जाण्यासाठी वळला इतक्यात त्याचे लक्ष नोंदणी करत असलेल्या एका मुलीकडे गेलं. तिने त्याच्याकडे पेन मागितला.कार्यशाळेत सहभागी होण्याच्या गडबडीत हि पेन विसरली असणार असं तो मनाशी म्हणाला. त्यानेही जास्त आनाकानी न करता तिला पेन देऊ केला. ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून श्वेताच होती. तिने ब्लॅक अँड व्हाईट पंजाबी ड्रेस घातला होता. खांद्यावर घेतलेली गुलाबी ओढणी तिला अधिक आकर्षक बनवत होती. श्वेता ही मुळातच नाजुक चणीची मुलगी आहे . त्यावर मोकळे सोडलेले केस तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत होते. आकाशने तिच्याकडे पाहीले अन् तो पाहतच राहिला. श्वेताच्या सौंदर्याने आकाशला भुरळ घातली होती. त्या सौंदर्याच्या मोहात आणि तिच्याकडे पाहण्याच्या नादात. तो इतका रममाण झाला होता की, त्याला आजूबाजूचे भानंच उरले नव्हते. श्वेताच्या आवाजाने तो भानावर आला.”धन्यवाद….” एवढं बोलून ती थांबली आणि विचार करू लागली. तितक्यात आकाश म्हणाला,”मी आकाश” अच्छा धन्यवाद आकाशजी मी श्वेता.” चला आत जाऊया ” श्वेता म्हणाली व दोघेही सभागृहाकडे रवाना झाले.
सभागृह गर्दीने गच्च भरलेले होते . सभागृहातील शेवटच्या रांगेत दोन खुर्च्या रिकाम्या होत्या. त्या दोन्ही खुर्च्यांवर यांनी बसकण मारले . उद्घाटन समारंभानंतर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रास सुरुवात झाली. पहिल्या सत्रातील प्रमुख वक्ते बोलायला उभे राहिले.” माझ्या तरुण लेखकांनो वैचारिक लेखन म्हणजे काही फार अवघड काम नाही. वैचारिक लेखन कोणीही करू शकतो.वैचारिक लेखन कोण करू शकतो जो स्वतः स जिवंत माणूस समजतो व ज्याला प्रश्न पडतात . असा कोणताही मानव वैचारिक लेखन करू शकतो. ” वक्त्याचे बोलणे सुरूच होते. आकाशला काही समजत नसूनही तो समजून घेण्याचे ढोंग करत होता. तेवढ्यात बाजूच्या खुर्चीवर बसलेला मुलगा आकाशला म्हणाला,” आकाश भाऊ हे फार अती होतंय राव . एवढं प्रचंड वैचारिक भाषण मी नाही पचवू शकत. हे मला शक्य नाही.हा वक्ता काय बोलतोय यातलं काहीएक मला समजत नाहीए सगळं भाषण माझ्या डोक्यावरून जात आहे. पण डोक्यात काहीच शिरत नाहीय. “त्या मुलाच्या चेहर्‍यावरील भाव आकाशाला जाणवत होते. ” धनु तू, तू कधी आलास. ” आकाश आश्चर्यचकित होऊन म्हणाला. आकाशला वाटले होते की धनंजय या कार्यशाळेला येणार नाही. कारण त्याच्या विभागातील एकही विद्यार्थी या कार्यशाळेस उपस्थित नव्हता. धनु हा आकाशचा जिवलग मित्र होता. धनु आणि आकाश ही पत्रकारिता विभागातील प्रसिद्ध जोडगोळी होती. त्यांची मैत्री आणि त्यांचे कारनामे अख्या विभागात प्रसिद्ध होते. बोजड भाषा ऐकून आकाशचेही मन बेजार झाले होते. त्याच्याही मेंदूवर ताण आला होता. त्यामुळे अशावेळी त्याच्या जवळच्या मित्राचं तिथे उपस्थित असणं त्याला फारच सुख मिळवून देत होतं.धनुशी बोलता-बोलता पहिलं सत्र कसं संपलं हे आकाशला समजलंच नाही.
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला आज मला महत्त्वाचे काम आहे.असे सांगून धनु ने मराठी विभागातून पळ काढला.अतीवैचारिक भाषेचा व बोजड शब्दांचा मारा सहन न झाल्यामुळेच धनु घरी गेला आहे . हे आकाशला माहीत होते. जवळच्या मित्राच्या जाण्याने तो थोडासा निराश झाला होता. परंतु आता आपल्याला श्वेताशी निवांत बोलता येईल . तिला मनसोक्त न्याहाळता येईल. या कल्पनेने तो मनोमन सुखावला होता.
दुसऱ्या सत्राची सुरुवात झाली . त्याच्या अपेक्षेप्रमाणेच श्वेता आकाश च्या बाजूला येऊन बसली. दुसऱ्या सत्रातील प्रमुख वक्त्याने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला,” वैचारिक लेखन म्हणजे घडून गेलेल्या घटनेचे स्पष्टीकरण करणे होय. एखाद्या घटनेचे वास्तव उलगडून सांगणे म्हणजेच वैचारिक लेखन होय. वास्तविकता उलगडून सांगण्यासाठी आपल्याला घटनेचे ज्ञान आणि तर्कबुद्धी दोन्हींची आवश्यकता असते. तरच आपण घटना उलगडून सांगू शकतो यातूनच वैचारिक लेखन सफल होते. ” वक्ता आपली भूमिका मांडत होता. आकाशही वक्त्याची भूमिका ऐकून घेत होता , ती ताडून पहात होता. तर्काला घासून पहात होता आणि पटलं तर वहीमध्ये नोट्स लिहून घेत होता. भाषण ऐकता ऐकता अधून-मधून आकाश श्वेताकडे चोरट्या नजरेने बघत होता. श्वेता ही अधून-मधून त्याच्याकडे बघत होती. दोघांची नजरानजर होताच पुन्हा ते नजरा चोरत होते. जणू काही त्यांनी सहज एकमेकांकडे बघितले, असं एक-दुसऱ्याला भासवत होते. आकाशच्या नजरेला नजर मिळताच स्वतःच्या चेहऱ्यावर आलेली , लाजेची छटा मात्र श्वेताला लपवता येत नव्हती. आकाशला श्वेताशी बोलावे, तिच्या मनातली इच्छा जाणून घ्यावी असे वारंवार वाटत होते. आता आपण बोलूया असं मनाशी ठरवून तो तिच्याकडे बघताच त्याच्या ओठांवर आलेले शब्द ओठांच्या आतच दडून राहत. असं बराच वेळ सुरू होते. दोघेही एकमेकांकडे बघत होते, हसत होते. पण बोलत मात्र कुणीच नव्हते. शेवटी श्वेता नीच पुढाकार घेत आकाश ला विचारले,” तुम्ही कोणत्या विभागाचे विद्यार्थी आहात.” पत्रकारिता विभाग आकाश थोडासा चाचरत म्हणाला. यापूर्वी त्याने कधीच कोण्या मुलीशी संवाद साधला नव्हता. त्यामुळेच त्याच्या बोलण्यात थोडासा मृदुपणा जाणवत होता. ” तुम्ही कोणत्या विभागात शकता ” आकाश ने श्वेताला विचारले. मी इतिहास विभागात शिकते . एवढे बोलून श्वेता थांबली. त्यानंतर बराच वेळ दोघंही एकमेकांशी बोलले नाही. पुन्हा दोघं एकमेकांकडे बघत राहिले एकमेकांशी नजरेने संभाषण करत राहिले.” तुम्ही कुठे राहता ” पुन्हा एकदा श्वेता म्हणाली. ” घरात ” आकाश विनोदी ढंगाने म्हणाला. त्यासरशी दोघेही खळखळून हसले. बराच वेळ दोघांची हसणे. तेही दबक्या आवाजात चालूच होते. हास्याचा ओघ ओसरल्यानंतर श्वेता म्हणाली,” मला असं विचारायचं होतं की तुमचा मूळ पत्ता कोणता. ” मी खुलताबादचा रहिवाशी आहे . थोड्याशा नाटकी स्वरात आकाश म्हणाला. त्याबरोबर पुन्हा एकदा दबक्या आवाजात श्वेता खळखळून हसली. हास्याचा ओघ ओसरल्यानंतर दोघेही एकमेकांकडे एकटक पाहू लागले. हे दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. त्यांचे नजरेने संभाषण साधने सुरू झाले. सभागृहातील वक्त्याचे भाषण एव्हाना संपले होते. दोघेही एकमेकांना पाहण्यात दंग झाले होते. नजरेने एकमेकांशी संवाद साधण्याच्या धुंदीत ते आसपासच्या जगाचे भान विसरले होते. ” श्वेता.. चल आपल्याला होस्टेलवर जायचे आहे. ” या शब्दांनी दोघेही भानावर आले. बोलणारी मुलगी श्वेताची मैत्रीण जयश्री होती.” जयश्री तू.. भाषण संपले का ..बरं चल आपण जाऊया ” ओशाळलेल्या स्वरात श्वेता बोलत होती. थोडसं दूर चालून श्वेता एकदम थांबली आणि जयश्रीकडे अंगुलीनिर्देश करत. म्हणाली आकाश ही माझी मैत्रीण जयश्री. ” अच्छा, हाय जयश्री ” आकाश कसाबसा बोलला. ” हाय आकाश , बर चल आता आम्हाला उशीर होतोय. नंतर पुन्हा कधीतरी भेटू या ” एवढे बोलून जयश्री थांबली. आणि दोघीही हॉस्टेल कडे जायला निघाल्या. दोघींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत आकाश बराच वेळ सभागृहात उभा होता. फोनच्या रिंगणे तो भानावर आला.” हा बोल प्रवीण.. हो येत आहे.. हा कार्यक्रम आत्ताच संपला.. बस आली का.. नाही.. बर आलोच मी अर्ध्या तासात..” एवढं बोलून त्याने फोन ठेवला आणि तो बस स्टॅन्ड कडे निघाला.
त्या दिवसापासून आकाश फक्त तिचाच विचार करत होता. त्या दिवशी जर मी तिला आणखी जास्त बोललो असतो तर. मी तिला तिचा मोबाईल नंबर मागितला असता तर..! मी तिला आणखी थांबण्याचा आग्रह केला असता तर..! तर किती चांगले झाले असते. आता ती मला पुन्हा कधी भेटेल का? भेटली तर मला ओळखेल का? ओळखले तर मला बोलेल का?बोललीच तर, मला तुझ्याशी मैत्री करायची आहे ,मला तुला जाणून घ्यायचे आहे ,असं मी तिला सांगू शकेल का? मी तिच्याविषयी इतका विचार करतोय ,तीही माझा इतकाच विचार करत असेल का?मी तिच्याकडे आकर्षित झालो आहे का?… की, मी तिच्या प्रेमात पडलोय. या व अशा नानाविध प्रश्नांनी आकाश आणखीनच अस्वस्थ होत होता. वारंवार तिच्या आठवणीत रमत होता.
आकाशच्या श्वेताविषयीच्या या भावनेला, प्रेम म्हणावं की फक्त शारीरिक आकर्षण हे मी वाचकांवरच सोपवतो.
– Story by Kumar Vaibhav

Leave a Reply

Close Menu

Wow look at this!

This is an optional, highly
customizable off canvas area.

About Salient

The Castle
Unit 345
2500 Castle Dr
Manhattan, NY

T: +216 (0)40 3629 4753
E: [email protected]